तंत्रज्ञान

⠷   तंत्रज्ञानाविषयी काही टिप्स   ⠷


सध्या अधिकाधिक आधुनिक स्मार्टफोन अक्षरशः दररोज बाजारात दाखल होत आहेत. त्यामुळे अनेक जण आपला स्मार्टफोन कमी कालावधीतच अपग्रेड करतात. त्यामुळे डेटा जुन्या स्मार्टफोनमधून नव्या फोनमध्ये घेणे, हे मात्र कठीण होऊन बसते. हे अवघड वाटणारे काम सोपे करण्यासाठी या काही टिप्स...

·       सर्व फोटो आणि व्हिडिओ :-
*   जुन्या फोनमधील फोटो आणि व्हिडिओ नव्या फोनवर ट्रान्स्फर करण्यासाठी सगळ्यात आधी ते फोनमधून कम्प्युटरवर घ्यावेत आणि नंतर दुसऱ्या फोनमध्ये घ्यावेत. कम्प्युटर नसल्यास खालीलपैकी एखादी पद्धत वापरता येऊ शकेल.
*   मेमरी कार्डचा वापर : ईएस फाइल एक्स्प्लोअरचा वापर करून प्रथम तुमच्या फोन मेमरीतील फोटो आणि व्हिडिओ मायक्रोएसडी कार्डवर घ्या. हे कार्ड दुसऱ्या फोनमध्ये घातल्यावर तुमचा सगळा डेटा त्या फोनवर जातो. या अॅपमध्ये एका वेळी अनेक फाइल्स सिलेक्ट करता येण्याची आणि नव्या ठिकाणी पाठवण्याची सोय आहे. 
*   'वाय-फाय'चा वापर : तुमच्या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डचा स्लॉट नसेल, तर तुमचे फोटो आणि व्हिडिओ दुसऱ्या फोनवर वायरलेस पद्धतीने पाठवता येतात. एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये वायरलेस डेटा ट्रान्स्फर करण्यासाठी प्ले स्टोअरवर अनेक अॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. त्यात शेअरइट, क्झेंडर, एसएफटी (स्विफ्ट फाइल ट्रान्स्फर), सुपरबीम आदींचा समावेश आहे. 
·       अॅप ट्रान्स्फर :-
*   फोनवरील अॅपच्या संपूर्ण बॅकअपसाठी हेलिअम हे अॅप चांगले आहे. यात बॅकअप घेतलेली अॅप नव्या फोनवर ट्रान्स्फरही करता येतात. तुम्हाला तुमचा अँड्रॉइड फोन रिसेट करायचा असेल, तर हेलिअम अॅप वापरल्यास तुमच्या फोनवरची अॅप्स तुम्हाला पुन्हा डाउनलोडही करावी लागत नाहीत. हे अॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला फोनमधील ज्या अॅप्सचा बॅकअप घ्यायचा असेल, ती सिलेक्ट करा. 'अॅप डेटा ओन्ली' हा पर्याय सिलेक्ट केल्यास बॅकअपची फाइल लहान असेल, पण तुम्हाला डेटा नंतर डाउनलोड करावा लागू शकतो. तुम्हाला पूर्ण बॅकअप हवा असेल, तर हा पर्याय सिलेक्ट करू नका. मायक्रो एसडी कार्ड, एक्स्टर्नल यूएसबी स्टोअरेज किंवा पर्सनल कम्प्युटर या ठिकाणी तुम्ही बॅकअप घेऊ शकता. जाहिरातींपासून सुटका हवी असेल, बॅकअपचे वेळापत्रक ठरवायची सुविधा हवी असेल, ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राइव्ह यांसारखी बॅकअप सोल्युशन्स हवी असतील, तर अॅपचे प्रीमिअम व्हर्जन घ्यावे लागते. 
·       काँटॅक्ट्स :-
*   अनेक जण आपल्या फोनमधील काँटॅक्ट्स गुगल अकाउंटशी सिंक्रोनाइज करून ठेवतात. त्यामुळे नव्या फोनवरून साइन इन केल्यानंतर गुगल अकाउंटवरचे काँटॅक्ट्स आपोआप नव्या फोनमध्ये ट्रान्स्फर होतात. तुमचे काँटॅक्ट्स गुगल अकाउंटशी सिंक केलेले नसतील, म्हणजे केवळ फोनवरच सेव्ह केलेले असतील, तर ते नव्या फोनमध्ये ट्रान्स्फर करण्यासाठी दोन पद्धती आहेत. 
·       सिम कार्डचा वापर :-
*   सिम कार्डवर २५० काँटॅक्ट्स सेव्ह करण्याची क्षमता असते. तुमचे काँटॅक्ट्स २५०पेक्षा कमी असतील, तर सिम कार्डद्वारे ते नव्या फोनवर ट्रान्स्फर करणे सहज शक्य आहे. त्यासाठी तुमच्या फोनच्या काँटॅक्ट्स अॅपमध्ये जाऊन इम्पोर्ट-एक्स्पोर्ट काँटॅक्ट्स हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमच्या फोनवरून काँटॅक्ट्स सिम कार्डवर एक्स्पोर्ट करा. हे सिम कार्ड नव्या फोनमध्ये घालून तिथे 'इम्पोर्ट फ्रॉम सिम कार्ड' हा पर्याय वापरून ते सारे काँटॅक्ट्स फोनवर ट्रान्स्फर करता येतात.

·       मेमरी कार्डचा वापर:-
*   फोनमधील अॅड्रेस बुक मेमरी कार्डमध्ये ट्रान्स्फर करता येते. काँटॅक्टची फाइल फोनमध्ये '.vcf' या फॉरमॅटमध्ये सेव्ह होते. हे मेमरी कार्ड नव्या फोनमध्ये घालून काँटॅक्ट्स इम्पोर्ट करता येतात. या पद्धतीने हजारो काँटॅक्ट्सही ट्रान्स्फर करता येतात. 
·       की - बोर्ड, सेव्ह केलेले शब्द :-
*   आपल्या स्मार्टफोनच्या कीबोर्डचे प्रशिक्षण देण्यासाठी बराच वेळ लागतो. नेहमी वापरले जाणारे शब्द, ठिकाणांची किंवा व्यक्तींची नावे तुम्ही की-बोर्डमध्ये अॅड करत राहता. त्यामुळे टायपिंग वेगाने करायला मदत होते. जेव्हा तुम्ही स्मार्टफोन बदलता, तेव्हा मात्र की-बोर्डला दिलेले हे सारे प्रशिक्षण वाया जाते आणि पुन्हा नव्याने सारे करावे लागते. स्विफ्टकी किंवा स्वाइप यांपैकी कोणता की-बोर्ड तुम्ही वापरत असाल, तर मात्र ही समस्या येत नाही. या की-बोर्डसाठी अकाउंट तयार होते. त्यामुळे तुम्ही फोनच्या की-बोर्डमध्ये सेव्ह केलेले शब्द सर्व्हरला सेव्ह होतात. फोन बदलल्यावर तुम्ही अॅप पुन्हा डाउनलोड करून साइन इन केले, की तुमचे सेव्ह केलेले शब्द तुम्हाला पहिल्याप्रमाणेच वापरता येतात. 
·       टेक्स्ट मेसेज :-
*   काँटॅक्ट्स ट्रान्स्फर करणे तसे सोपे असले, तरी फोनमधील मेसेज ट्रान्स्फर करणे काहीसे गुंतागुंतीचे असते. 'फ्री एसएमएस बॅकअप अँड रिस्टोअर अॅप' (रितेश साहू) या कामासाठी उपयुक्त आहे. या अॅपवर जाहिराती असतात, पण त्याद्वारे एकदम सोप्या पद्धतीने 'वन टच बॅकअप आणि रिस्टोअरेशन' शक्य आहे. तुम्हाला बॅकअप कोठे तयार करायचा आहे, तो फोल्डरही तयार करता येऊ शकतो आणि थेट एक्स्टर्नल स्टोअरेजमध्ये सेव्ह करण्याची सुविधाही यात उपलब्ध आहे. बॅकअपचे वेळापत्रक निश्चित करणे, पासवर्ड प्रोटेक्शन, एमएमएस इनेबल किंवा डिसेबल करणे, अशा विविध सुविधा या अॅपमध्ये उपलब्ध आहेत. मेन मेनूमधून मेसेज रिस्टोअर करता आले नाहीत, तर बॅकअप फाइलमधून मेसेज एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी दुसरी पद्धतही यात उपलब्ध आहे. 
·       होम स्क्रीन लेआउट :-
*   जेव्हा तुम्ही नवा अँड्रॉइड फोन घेता, तेव्हा त्यातील सगळ्या गोष्टींचे सेटिंग तुमच्या मनाप्रमाणे व्हायला खूप वेळ लागतो. होम स्क्रीनच्या पेजेसची संख्या, कोणत्या अॅपचा शॉर्टकट कुठे ठेवायचा, विजेट कोठे असावीत, यांसारख्या गोष्टींचा त्यात समावेश असतो. तुमच्याकडे नोव्हा लाँचर असेल, तर तुमच्या होम स्क्रीन लेआउटचाही पूर्ण बॅकअप घेता येतो. नव्या फोनवर नोव्हासह बाकीची अॅप्स तुम्ही इन्स्टॉल करता, तेव्हा तुम्हाला होम स्क्रीन लेआउटही रिस्टोअर करता येतो. 
·       व्हॉट्सप कन्व्हर्सेशन्स :-
*   व्हॉट्सपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. व्हॉट्सअॅप न वापरणारा स्मार्टफोन यूजर शोधावा लागेल. या व्हॉट्सअॅपमध्ये दररोज ठरलेल्या वेळी (साधारणतः पहाटे चार वाजता) सर्व चॅटचा फोनमध्ये बॅकअप घेतला जातो, हे अनेकांना माहिती नसेल. या फाइल्स तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप फोल्डरमध्ये साठवल्या जातात. तुम्ही नवीन फोन घेतला असेल, तर त्यावर व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करा, पण ते आधी सुरू करू नका. तुमचा जुना फोन कम्प्युटरला जोडा आणि तुमच्या फोनवरील व्हॉट्सअॅप फोल्डरवर जा. त्यातील डेटाबेसेस असे नाव असलेला फोल्डर तुमच्या कम्प्युटरच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा. आता नवा फोन कम्प्युटरला जोडा आणि रूट डिरेक्टरीमध्ये व्हॉट्सअॅप नावाचा फोल्डर तयार करा. तुम्ही तयार केलेला डेटाबेसेस हा फोल्डर नव्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप फोल्डरमध्ये पेस्ट करा. त्यानंतर त्या फोनमध्ये डाउनलोड केलेले व्हॉट्सअॅप लाँच करा. सेटअप प्रोसेस करा. सर्वांत शेवटी तुम्हाला 'चॅट बॅकअप फाउंड, डू यू वाँट टू रिस्टोअर?' असा प्रश्न विचारला जाईल. त्याला 'येस' असे उत्तर द्या. त्यानंतर काही मिनिटांत चॅट बॅकअप नव्या स्मार्टफोनमध्ये आलेला दिसेल. 
·       मल्टि प्लॅटफॉर्म ट्रान्स्फर :-
*   काही फोनमध्ये डेटा ट्रान्स्फर करण्यासाठीची अॅप असतात. तसे अॅप नसेल, तर 'वंडरशेअर'ने सादर केलेले 'मोबाइल-गो' अॅप वापरून पाहा. दोन मोबाइलमध्ये डेटा ट्रान्स्फर करण्यासाठीचा हा सोपा आणि मोफत पर्याय आहे. याद्वारे आयओएस आणि अँड्रॉइड या फोनमध्येही डेटा ट्रान्स्फर करणे शक्य होते. त्यासाठी http://mobilego.wondershare.com या लिंकवरून पीसी इन्स्टॉलर डाउनलोड करून घ्या. त्यातील बिल्ट इन मीडिया मॅनेजर तुम्हाला तुमच्या मल्टिमीडिया कंटेंटचे व्यवस्थापन, तसेच ट्रान्स्फर यांसाठी मदत करील. अनावश्यक काँटॅक्ट्स काढून टाकणे, फोनवरील अॅपचे व्यवस्थापन करणे, कम्प्युटरवरून एसएमएस पाठवणे किंवा पाहणे, स्क्रीनशॉट घेणे आदी कामे करता येतात. याद्वारे 'पीसी'वरही अॅप घेता येतात. केवळ अँड्रॉइडसाठीचे अॅप घेतले, तर मोबाइलमधील जंक क्लीन करणे, स्पीड वाढवणे, तसेच 'पीसी'शी वायरलेस कनेक्शन प्रस्थापित करणे यासाठी हे अॅप मदत करते.

 ___________________________________________

*विंडोज मध्ये हार्ड डिस्कची स्पेस फ्री करण्याचे 10 मार्ग *
v अव्यवस्था तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते, मग तुम्ही घरी, ऑफिसात किंवा अगदी तुमच्या कॉम्प्यूटरवर असा. काही गोष्टी क्रमाने न ठेवणे हेच एक कारण आहे कालांतराने गोंधळ निर्माण करणारे. काही कालावधीनंतर अनेक फाइल्स, प्रोग्राम्स तुमच्या कॉम्प्यूटरचे खुप बाइटस वापरतात आणि नंतर तुमच्या लक्षात येते की आता डिस्क क्लिनअप करायला हवी. पण कशी?
Ø यासाठी नको असलेल्या फाईल्स डिलिट करणे पुरेसे नाही. तर तुम्हाला मोठया आकाराच्या फाइल्स आणि फोल्डर्स शोधून काढावे लागतील आणि सिस्टिम प्रोसेसला हानी होणार नाही याची खात्री करून ते डिलीट करावे लागेल. पण खालील काही जलद आणि सोप्या टिप्स्तुम्हाला काही पर्याय देतील हार्ड डिस्कची स्पेस फ्री करण्याचे आणि तुम्ही कधी विचार देखील केला नसेल येवढी स्पेस तुम्ही फ्री करू शकाल.
      1) Analyze Disk Space :-
§  प्रथम तूम्हाला कोणत्या फाइल्स जास्त जागा व्यापत आहे याचे विश्लेषण करावे लागेल. जलद विश्लेषण करण्यासाठी आणि डिस्क क्लिनअप करण्यासाठी तुम्ही काही थर्ड पार्टी टूल्स वापरू शकता.
§  WinDirStat हे मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या विविध आवृत्ती मधील डिस्क वापराची आकडेवारी दाखविणारे आणि क्लिनअप टूल आहे. WinDirStat हे नक्की कोणते फोल्डर, फाइल्सचा प्रकार, फाइल्स जास्त जागा वापरत आहेत हे दाखवते. पण एखादी फाइल किंवा फोल्डर डिलीट करण्याआधी ते महत्वाचे तर नाही याची खात्री करून घ्या. तसेच तो एखादा प्रोग्राम किती जागा घेत आहे हे सुध्दा दर्शवितो आणि मग तुम्ही नको असलेले आणि जास्त जागा व्यापत असलेले प्रोग्राम्स काढून टाकू शकता.
    2) Uninstall Unnecessary Programs :-
§  जर तुम्ही इन्स्टॉल केलेला एखादा प्रोग्राम खुप कालावधीत रन देखील केला नसेल आणि त्याचा आकार जास्त असेल तर तो अनइन्स्टॉल करून कार्ड डिस्क वरील बरीच जागा वाचवता येते. कदाचित हे प्रोग्राम फक्त ट्राय म्हणून असतील, गेम्स असतील किंवा सॉफ्टवेअरचे जुने व्हर्जन असू शकतील. अश्या वेळी हे प्रोग्राम्स अनइन्स्टॉल करण्यासाठी विंडोज मधील इनबिल्ट Programs and Features चा वापर करू शकता किंवा थर्ड पार्टी टूल CCleaner चा वापर करू शकता.
    3) Clear Temporary Files :-
§  जर तुम्हाला तुमच्या हार्ड वरील स्पेस फ्री करण्यासाठी आणि पीसीचा वेग वाढवण्यासाठी नको असलेल्या फाईल्सची संख्या कमी करावयाची असेल तर Disk Cleanup वापरा. Disk Cleanup टेम्पररी फाईल्स काढून टाकते, नको असलेल्या सिस्टिम फाईल्स आणि इतर आयटम्स काढून टाकते, ज्यांची तुम्हाला कधी आवश्यक्ता नसते. पण Disk Cleanup टूल मध्ये फायरफॉक्स किंवा क्रोम सारख्या ब्राउझर मधील टेम्पररी फाइल्स काढण्याची क्षमता नसते, जे हार्ड डिस्क मधील खुप जागा व्यापतात. त्यामुळे अधिक आक्रमकपणे टेम्पररी फाईल्स आणि जंक फाईल्स क्लिन करण्यासाठी CCleaner वापरा.
   4) Remove Duplicate Files :-
§  तुम्हाला कदाचित याची जाणिव नसेल कि, तुमच्या पीसीतील हार्ड डिस्कवरील मोल्यवान जागा डुप्लिकेट फाइल्स वाया घालवू शकतात. डुप्लिकेट फाइल्स एकाच फाईल्सच्या अनेक प्रती वेगवेगळया जागेंवर ठेवणे, फाईल्स चुकिच्या जागी ठेवणे, एका पेक्षा अनेक डाउनलोडस अश्या विविध कारणांनी तयार होतात. जरी डुप्लिकेट फाइल्स शोधून काढणे कठिण काम असले तरी सुदैवाने अनेक प्रोग्राम्स आहेत जे काही मिनिटात डुप्लिकेट फाइल्स शोधून काढू शकतात आणि डिस्क वरील भरपूर जागा रिकामी करतात. येथे काही फ्री टूल्स आहेत -
       i) dupeGuru :-
o   या कामासांठी dupeGuru हे एक ग्रेट अॅप्लिकेशन आहे. हे पुर्णपणे मोफत आहे आणि डुप्लिकेट फाइल्स शोधण्यासाठी सक्षम आहे. तसेच हे पुर्णपणे कस्टमाइझेबल आहे, जेणेकरून यातील मॅचिंग इंजिनला कोणत्या डुप्लिकेट फाइल शोधायच्या आहेत त्याप्रमाणे सेट करू शकता.
       ii) Awesome Duplicate Photo Finder :-
o   कदाचित तुम्हाला तुमच्या कॅमेरा किंवा स्मार्ट फोनमधील सर्व फोटो पीसी मध्ये कॉपी करण्याची सवय असेल, पण तुम्ही त्यांना कधी क्रमवारीत लावत नसाल. याचा परिणाम अनेक डुप्लिकेट फोटो डिस्क मध्ये  अस्ताव्यस्त पडण्यात होतो. मग अश्या वेळी या डुप्लिकेट इमेजेस काढून टाकण्यासाठी तुम्हाला या टूलची गरज भासेल.Awesome Duplicate Photo Finder हे एक फ्री टूल आहे, जे तुमच्या पीसी मधील डुप्लिकेट फाइल्स शोधून काढून टाकते. या प्रोग्राम मध्ये डुप्लीकेट किंवा अगदी तत्सम इमेजेस काढून टाकण्याची क्षमता आहे.
     5) Place On Other Source :-
§  जर तुमच्या कडे फोटो, व्हिडीओ, म्युझिक किंवा इतर फाईल्स असतील ज्या तुम्हाला उपयोगी असतील पण त्यांना अपरिहार्यपणे तुमच्या पीसी वर ठेवण्याची आवश्यक्ता नसेल तर या फाईल्स एक्सर्टनल मिडिया जसे युएसबी ड्राइव्ह, डिव्हिडी किंवा क्लाऊड स्टोरेज मध्ये ठेऊ शकता. क्लाऊड स्टोरेज हे युझरला कोणत्याही साइजची आणि कोणत्याही टाइपची फाइल अपलोड करण्याची परवानगी देतो. Google Drive, Dripbox आणि OneDrive हे काही प्रसिध्द क्लाऊड स्टोरेज आहेत. काही क्लाऊड स्टोरेज हे काही लिमिटेशन मध्ये मोफत अकाउंट देतात.
    6) Compress Files or Folders :-
§  फाइल्स आणि फोल्डर्स कंप्रेस करून सुध्दा हार्ड डिस्क वरील बरिच स्पेस तुम्ही वाचवू शकता. कंप्रेस फाइल्स आणि फोल्डर्स मध्ये काम करणे हे अनकंप्रेस फाइल्स आणि फोल्डर मध्ये काम करण्याइतकेच सोपे आहे. तसेच तुम्ही अनेक फाइल्स एक कंप्रेस फोल्डर मध्ये एकत्र करू शकता.फाइल किंवा फोल्डर वर राइट क्लिक करा आणि Send to हा पर्याय निवडा.नंतर Compressed (zipped) folder वर क्लिक करा.आता याच लोकेशन मध्ये एक कंप्रेस फोल्डर तयार झालेले असेल.
     7) Delete Old Users Folder :-
§  जर तुमच्या पीसी मध्ये जुने आउट डेटेड युझर आणि सिस्टिम फाइल्सचा बॅकअप आणि सिस्टिम इमेज असतील तर तुम्ही स्पेस फ्रि करण्यासाठी यांना डिलीट करू शकता.
  • विंडोज 7 मध्ये अॅडमिनिस्ट्रेटर लॉगिन करावे.My Computer – C Drive – Users Folder मध्ये जा.अकाउंट नेम संबंधीत फोल्डर वर राइट क्लिक करा आणि कंटेक्स्ट मेनू मधील Delete हा पर्याय निवडा.
*   जर तुम्हाला अजून हार्ड डिस्क मधील स्पेस फ्री करावयाची असेल तर खालील पर्याय वापरावेत -
      8) Delete System Restore Points :-
§  सिस्टिम रिस्टोर हे विंडोज मधील एक उपयुक्त वैशिष्टय आहे. पण सिस्टिम रिस्टोर मध्ये भरपूर डेटा असू शकतो. सिस्टिम मध्ये अनेक रिस्टोर पॉइंट तयार होतात, पण तुम्ही एक-एकरिस्टोर पॉइंट डिलीट करू शकत नाही तर एकाच वेळी सर्व किंवा सर्व पण सर्वात अलीकडील रिस्टोर पॉइंट डिलीट करू शकता. हे रिस्टोर पॉइंट डिलीट करून तुम्ही तात्पूरता डिस्क फ्री करू शकता, कारण नविन रिस्टोर पॉइंट पुन्हा तयार होतात आणि डिस्क वरील जागा व्यापतात.
Ø सर्व रिस्टोर पॉइंट डिलीट करण्यासाठी -
§  My Computer वर राइट क्लिक करून Properties वर क्लिक करा. (किंवा windows + Pause/Break कि प्रेस करा.)डाव्या पेन मधील System protection ला क्लिक करा. Protection Settings खालील Configure ला क्लिक करा. Disk Space Usage खालील Delete ला क्लिक करा.संरक्षण सेटिंग्ज अंतर्गत संरचीत करा क्लिक करा.डिस्क स्पेस वापर अंतर्गत, हटवा क्लिक करा.सुरू ठेवा क्लिक करा, आणि नंतर ओके क्लिक करा.Continue ला क्लिक करून Ok ला क्लिक करा.
    9) Disable Hibernation and Delete hiberfil.sys File :-
§  हायबरनेट हि एक पॉवर सेव्हिंग मोड आहे जि प्रामुख्याने लॅपटॉप साठी तयार केलेली आहे. यात ओपन असलेले कोणतेही डॉक्युमेंट किंवा प्रोग्राम मेमरी मध्ये ठेवला जातो आणि जेव्हा पॉवर फेल होते तेव्हा विंडोज तुमचे काम या मेमरीतुन रिस्टोर होते. हायबरनेट मोड hiberfil.sys फाइलचा वापर पीसीची करंट स्टेट स्टोअर करण्याठी करते. जर तुम्ही तुमचा पीसी हायबरनेट करू इच्छित नसाल तर तुम्ही हा मोड डिसॅबल करू शकता आणि hiberfil.sys फाइल डिलीट करून हार्ड डिस्क वरील स्पेस काही प्रमाण फ्री करू शकता.डिफॉल्ट hiberfil.sys (c: \ hiberfil.sys) फाइलचा आकार हा कॉम्प्यूटर वर इन्स्टॉल रॅमच्या 75% असतो.
§  Command Prompt वर राइट क्लिक करा आणि Run as Administrator हा ऑप्शन सिलेक्ट करा.Command Prompt मध्ये powercfg.exe /hibernate off टाइप करा आणि Enter करा.
      


10) Delete Windows.old Folder :-
§  जर विंडोज च्या इन्स्टॉलेशनच्या वेळी ड्राइव्ह फॉम्रॅट न करता कस्टम इन्स्टॉलेशन केले असेल तर जुन्या विंडोजच्या फाइल्स Windows.old फोल्डर मध्ये स्टोअर होतात. विंडोज इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही हे फोल्डर Disk Cleanup चा वापर करून स्पेस फ्री करण्यासाठी डिलीट करू शकता.
  • विंडोज 7 मधील सर्च बॉक्स मध्ये Disk Cleanup टाइप करून आलेल्या रिझल्ट मधून Disk Cleanup वर क्लिक करावे.नंतर तुम्हाला ड्राइव्ह सिलेक्ट करून Ok वर क्लिक करावे. Disk Cleanup च्या डायलॉग बॉक्स मध्ये Clean up system files वर क्लिक करावे. Previous Windows installation(s) हा चेक बॉक्स सिलेक्ट करावा आणि ज्या फाइल्स डिलीट करावयाच्या असतील त्या समोरील चेक बॉक्सवर क्लिक करावे.शेवटी Ok वर क्लिक करावे.नंतर आलेल्या मॅसेज मधील Delete Files वर क्लिक करावे.



































No comments:

Post a Comment