Gmail Tricks :

➤आपण पाठवलेला मेल ज्या व्यक्तीला पाठविला आहे त्याने वाचला आहे की नाही हे तपासणे.

*आपण एखाद्याला जर मेल पाठवला असेल तर Whatsapp वर जसे मेसेज वाचला आहे का ते समजते .पण मेल वाचला कि नाही  समजत नाही.

आपण पाठवलेला  मेल वाचला गेला आहे कि नाही  किंवा मेल केव्हा वाचला गेला हे कसे पाहायचे याबद्दल ट्रीक सांगणार आहे.

* यासाठी  क्रोम ब्राऊझर मध्ये एका app चे extension घ्यावे लागेल *


१.सर्व प्रथम क्रोम ब्राउझर ओपन करा.

२.गुगल मध्ये Mailtrack for gmail सर्च करा.

३.सर्वप्रथम Mailtrack for Gmail & Inbox: Email tracking - Chrome Web Store ही लिंक येईल त्याच्यावर क्लिक करा.

४.आता आपल्या समोर एक विंडो येईल त्याच्यावर उजव्या कोपऱ्यात + ADD TO CHROME येईल त्याच्यावर क्लिक करा.

५.आता एक बॉक्स मध्ये नोटिफिकेशन येईल त्याच्या डाव्या बाजूच्या add extension वर क्लिक करा.

६.आता नवीन विंडो ओपन होईल त्याच्यात Sign in with Google वर क्लिक करा

७.आता एक नोटिफिकेशन येईल त्यातील Allow वर क्लिक करा.

८.एक नवीन विंडो येईल , आपल्याला फ्री मध्ये ही सुविधा वापरायची असल्यामुळे Upgrate खालील no thanks वर क्लिक करा.

९.अशा प्रकारे ही सुविधा आपल्या gmail वर activated झाली असेल.

११.आपण जेव्हा मेल पाठवू तेव्हा मेल ज्या बॉक्समध्ये लिहितो तेथे send with mailtrack च्या बाजूच्या remove वर क्लिक करू नका.

१२.आपला मेल त्या व्यक्तीने वाचला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्या gmail मधील sent mail वर क्लिक करा जो मेल पाठवलं असेल त्याच्या समोर दोन चेकमार्क हिरव्या रंगात असतील तर आपला मेल वाचला गेला असेल.

१३.त्या व्यक्तीने तो मेल कधी वाचला हे पाहायचे असेल तर चेकमार्क वर माऊस चा कर्सर ठेव्हा काळ्या रंगात वेळ व तारीख मिळेल.

१४.अशा प्रकारे आपला मेल वाचला गेला आहे किंवा नाही तसेच कधी वाचला हे समजणार आहे.

      * धन्यवाद *

No comments:

Post a Comment